महिनाभर आजारी असलेल्या जुई गडकरीची तब्येत आता कशी आहे?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 26, 2024

Hindustan Times
Marathi

टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'.

‘ठरलं तर मग’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिका वठवताना दिसत आहे. 

या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 

जुईने गेल्या महिनाभरापासून आजारी असताना देखील मालिकेचे शुटिंग पूर्ण केल्याची माहिती समोर आली होती.

अभिनेत्री जुई गडकरी हिचे चाहते चांगलेच काळजीत पडले होते आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करत होते.

मात्र, आता जुई गडकरी हिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये जुई गडकरी खूपच सुंदर दिसत असून, तिची तब्येत देखील सुधारल्याचे दिसत आहे.

जुईचा हा अंदाज पाहून आता चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सगळेच तिच्या फोटोंना लाईक करत आहेत.

जुई गडकरीने नुकतेच तिचे पिवळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत, हा लूक एका खास कारणासाठी आहे.

लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?