हनुमानाला या राशी खूपच प्रिय,

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते. या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला.

यंदा हनुमान जयंती मंगळावरी (२३ एप्रिल) २०२४ रोजी आहे.

वीर हनुमानजींना ४ राशी खूपच प्रिय आहेत, त्या चार राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

मेष ही हनुमानाच्या आवडत्या राशींपैकी एक आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळवार हनुमानाला समर्पित आहे, म्हणून हनुमानाचे मंगळ ग्रहाशी चांगले संबंध मानले जातात. 

मेष

तसेच जर तुमच्या कुंडलीत मंगळाचा प्रतिकूल प्रभाव पडत असेल तर तुम्ही फक्त हनुमान जयंतीलाच नव्हे तर इतर दिवशीही हनुमानाची पूजा करावी.

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. सूर्यदेव हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. भगवान हनुमानाचे गुरु देखील सूर्य देव आहेत. 

सिंह 

बजरंगबलीने सूर्यदेवाकडून शिक्षण घेतले असून त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या आहेत. त्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद त्यांच्या गुरूंच्या राशीवर सदैव राहतो.   

कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे.  कुंभ राशीच्या लोकांना देखील हनुमानाचा आशीर्वाद मिळतो. 

कुंभ 

कारण पौराणिक कथेनुसार जेव्हा रावणाच्या लंकेत शनिदेवाचे दहन केले गेले तेव्हा भगवान हनुमानाने त्यांच्या शरीरावर मोहरीचे तेल लावले होते. तेव्हापासून शनिदेवाला तेल अर्पण केले जाते. 

त्याचवेळी शनिदेवाने सांगितले होते की, हनुमानची पूजा केल्याने लोकांना शनीच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून हनुमान आणि शनिदेव हे मित्र मानले जातात.

वृश्चिक राशीचा स्वामीही मंगळ आहे. या कारणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा सदैव राहते. वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. 

वृश्चिक 

हनुमानाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर हनुमान जयंतीला बजरंगबलीला लाडू अर्पण करा. यामुळे शक्ती, बुद्धिमत्ता आणि कीर्ती वाढते. 

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या