चैत्र की कार्तिक? नेमका कधी झाला भगवान हनुमानाचा जन्म?
By Harshada Bhirvandekar Apr 22, 2024
Hindustan Times Marathi
हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. पहिल्यांदा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि दुसऱ्यांदा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला..
पण, भगवान हनुमानाचा जन्म नक्की कार्तिक महिन्यात झाला होता की, चैत्र महिन्यात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. यामागे अनेक कथा आहे.
लहानपणी भुकेलेले मारुतीराया सूर्यदेवाकडे झेप घेऊन त्यालाच फळ समजून खाऊ लागली. त्यावेळी राहू सूर्यग्रहण करणार होता.
पण, बालहनुमान त्यांच्या दिशेने वेगाने जाताना पाहून सूर्यदेव घाबरले. त्यांनी थेट इंद्रदेवाकडे मदत मागितली तेव्हा, देवराज इंद्र तिथे प्रकट झाले.
इंद्रदेवाने हनुमानावर विजांच्या कडकडाटाने प्रहार केला आणि त्यांना बेशुद्ध पाडले. ही घटना पवनदेवाला समजताच ते संतापले.
पवनदेवाने संपूर्ण वायुमंडलातील वाऱ्याचा प्रवाह थांबवला. यामुळे ब्रह्मा देव आणि इतर देवतांनी वायुदेवाकडे धावा घेऊन हनुमानजींना दुसरे जीवन प्रदान केले.
केवळ जीवनच नाही, तर देवतांनी आपापल्या शक्ती देखील हनुमाला देऊ केल्या. म्हणून या दिवशी हनुमानाला दुसरा जन्म मिळाला, असे म्हटले जाते.
ही घटना घडली तेव्हा चैत्र महिन्यातील पौर्णिमेची तिथी होती. म्हणून या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते.
तर, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हनुमानाचा जन्म झाला, असे अनेक पौराणिक कथांमध्ये म्हटले गेले आहे.