तेजश्री प्रधानला पैसे द्यायला सेटवर यायचे लोक!

All Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे.

तिची नवी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

यातील ‘मुक्ता’ आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असली तरीं, आजही चाहते तेजश्रीला ‘जान्हवी’ म्हणूनच जास्त ओळखतात.

छोट्या पडद्यावरच्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तेजश्री प्रधान हिला घराघरांत ओळख मिळवून दिली होती.

याच मालिकेच्या सेटवर तिला चाहते चक्क पैसे देण्यासाठी यायचे. यामागे कारण देखील भन्नाट आहे.

या मालिकेत गरीब जान्हवीची आपल्या बाबांच्या गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी पैसे जमवण्याची धडपड सुरू असते, असा एक ट्रॅक होता.

जान्हवीची तिच्या बाबांसाठी चाललेली धडपड पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी यायचे. 

अनेक चाहते तर जान्हवीला भेटायला सेटवर पोहोचायचे. सीन पूर्ण होईपर्यंत थांबायचे आणि नंतर येऊन तिला पैसे द्यायचे.

‘हे पैसे जमव आणि बाबांचं ऑपरेशन कर. तुझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी हा आमचा खारीचा वाटा’, असं म्हणत चाहते तिला पैसे द्यायचे.

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या