मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ व ‘रोमॅंटिक हीरो’ म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी.
स्वप्नील जोशीने आजवर अनेक मालिका व चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे स्वप्नीलने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
आजही स्वप्नील जोशी आवर्जून घरातली सर्व कामे करत असल्याचे त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितले.
स्वप्नील जोशीने म्हटले की, ‘मी घरातली सर्वच कामे करतो. मी एकुलता एक असल्यामुळे आईने आधीच सांगितलं होतं की रोज घरातलं एक तरी काम करायचंच, जे मी आजही करतोच.’
स्वप्नील जोशी आजही स्वतःच्या घरात केर काढणे, कपबशी धुणे अशी सगळी घरकामे करतो.
स्वप्नील जोशी याच्या घरात २ मदतनीस आहेत. पण हा एक शिस्तीचा भाग असल्याचं तो म्हणतो.
तुला काम आलं पाहिजे हे आईने आधीच सांगून ठेवलं आहे, असं स्वप्नील म्हणतो.
तू मुलगा आहेस म्हणून तुला वेगळा न्याय नाही मिळणार, अशी तंबी स्वप्नीलला आईकडून मिळालीय.