बुद्ध पौर्णिमेला दान करा ‘या’ ६ गोष्टी; पूर्वज होती प्रसन्न!

By Harshada Bhirvandekar
May 19, 2024

Hindustan Times
Marathi

वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हणतात. बौद्ध धर्मीय लोक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.

याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते.

याच तिथीला त्यांनी वर्षानुवर्षे तप करून बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती.

यामुळेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जगभरातील बौद्ध धर्मीय अनुयायी बोधगयाला येतात.

यंदा भगवान बुद्धांची २५८६वी जयंती आहे. बुद्ध पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी आहे.

बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माचा मुख्य सण मानला जातो आणि तो मोठ्याने साजरा केला जातो.

या दिवशी दान करण्याची परंपरा आहे. या दिवशी दान केल्याने पितर प्रसन्न होतात, असे मानले जाते.

बुद्ध पौर्णिमेला पंखा, पाण्याने भरलेले मातीचे भांडे, चप्पल, छत्री, धान्य, फळे या गोष्टी दान कराव्यात.

त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमेला पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत. भगवान बुद्धांना मिठाई अर्पण करावी. 

हाडे मजबूत करणारे पदार्थ