भगवान श्रीकृष्णाचं सासर कुठेय माहितीय का?

By Harshada Bhirvandekar
May 02, 2024

Hindustan Times
Marathi

मथुरेच्या कारावासात श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. 

पण, तुम्हाला माहित आहे का की, श्रीकृष्णाचे सासर कुठे आहे? चला जाणून घेऊया...   

शास्त्र आणि पुराणानुसार अमरावती हे श्रीकृष्णाचे सासर मानले जाते. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी हिचा जन्म अमरावतीच्या कौंडण्यपूर गावात झाला.

देवी रुक्मिणीच्या वडिलांचे नाव भीष्मक होते. रुक्मिणी आपल्या मैत्रिणींसोबत अंबादेवीच्या दर्शनासाठी जात असताना श्रीकृष्णाने त्यांना पळवून नेलं होतं. 

खरंतर, देवी रुक्मिणीने श्रीकृष्णाला कधीच पाहिलं नव्हतं. मात्र, त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. 

श्रीकृष्णाच्या लीला ऐकून देवी रुक्मिणी श्रीकृष्णाच्या प्रेमात पडली होती आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  

मात्र, देवी रुक्मिणीचे वडील आणि भाऊ यांनी तिचे लग्न दुसऱ्या एका राजाशी निश्चित केले होते. 

परंतु, कृष्णाशी विवाह व्हावा म्हणून देवी रुक्मिणी मंदिरात चालल्या होत्या. त्यावेळी श्रीकृष्ण तिथे पोहोचले. 

त्यावेळी देवी रुक्मिणीच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे अपहरण करून तिच्याशी विवाह केला. देवी रुक्मिणी ही अमरावतीची राजकन्या होती.

चहा आणि कॉफी न पिण्याचे फायदे ऐकलेत का?

All Photos: Pexel