‘या’ ७ गोष्टी तुमच्या घरात घेऊन येतील गुडलक!
By
Harshada Bhirvandekar
May 16, 2024
Hindustan Times
Marathi
वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरामध्ये सौभाग्य येते. अशाच सात गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
मोराची पिसे अर्थात मोर पंख घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. त्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या देखील दूर राहतात.
घराच्या पश्चिम दिशेला पांढरे किंवा सोनेरी रंगाचे कॅलेंडर ठेवणे शुभ मानले जाते.
घरात निसर्गाचे चित्र, धावणाऱ्या ७ घोड्यांचे चित्र किंवा पोहणाऱ्या माशांचे फोटो लावावे, हे शुभ असते.
घराच्या आत तांब्यापासून बनवलेले स्वास्तिक ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये नेहमी नारळ ठेवावा. त्यामुळे लक्ष्मीचा वास राहतो.
वास्तुशास्त्रानुसार घरात गणपतीची मूर्ती ठेवल्याने सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात.
तुळशीचे रोप हे प्रत्येक घरात ठेवलेच पाहिजे. ते पूर्व दिशेला किंवा देव्हाऱ्यापासून जवळ ठेवावे.
लेडी सुपरस्टार नयनताराच्या साडीत दिलखेचक अदा
Instagram
पुढील स्टोरी क्लिक करा