चैत्र कृष्ण महिना या राशींसाठी लकी

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 24, 2024

Hindustan Times
Marathi

पंचांगानुसार आजपासून (२४ एप्रिल) चैत्र कृष्ण महिना सुरू झाला आहे. हा महिना ९ मे पर्यंत राहिल. 

हिंदू धर्मात चैत्र कृष्ण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात उष्णता खूप तीव्र असते, त्यामुळे पंखा, कपडे, चप्पल आणि पाणी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

आज आम्ही तुम्हाला या महिन्यातील ५ भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी हा महिना खूप खास असणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी चैत्र कृष्ण महिना खूप चांगला आहे. व्यावसायिकांसाठी काळ आहे, व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. 

मेष

या महिन्यात तुम्ही नवीन मालमत्तेचे किंवा वाहन खरेदी करू शकता. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती सुधारेल.

मिथुन राशीच्या लोकांसाठी चैत्र कृष्ण महिना शुभ असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. 

मिथुन

अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी वेळ अनुकूल असेल. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळेल.

कर्क राशीच्या लोकांना चैत्र कृष्ण महिन्यात खूप फायदा होणार आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. तसेच वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. 

कर्क 

मानसिक तणाव दूर होईल, सकारात्मक वाटेल. उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला राहील, चांगले परिणाम मिळू शकतात.

धनु राशीच्या लोकांना चैत्र कृष्ण महिन्यात विशेष लाभ होणार आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती सुधारेल.

धनु

मीन राशीच्या लोकांना चैत्र कृष्ण महिन्यात अनेक नवीन संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. 

मीन

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना यश मिळेल. अविवाहित लोक जोडीदार शोधू शकतात. या व्यतिरिक्त, कौटुंबिक संबंध देखील घट्ट होतील.