‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या लग्नाचा अल्बम!

By Harshada Bhirvandekar
May 04, 2024

Hindustan Times
Marathi

‘पारू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शरयू सोनवणे.

अल्पावधीतच या मालिकेने व शरयूने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

तिची ‘पारू’ ही भूमिका सध्या विशेष गाजत असून या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

आपल्या भूमिकेने चर्चेत राहणारी अभिनेत्री शरयू सोनावणे सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. 

शरयूने काल तिच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही खास फोटो शेअर केले.

‘३६५ दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम.’ असं म्हणत तिने लग्नाचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत.

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मंगळसूत्राचीही खास झलक पाहायला मिळाली.

शरयूने तिच्या लग्नात लाल रंगाची सुंदर नक्षीकाम असलेल्या काठाची भरजरी पैठणी परिधान केली होती.

तर, तिचा नवरा जयंतने पांढऱ्या रंगाचा कुर्ता त्यावर लाल रंगाचे धोतर व लाल रंगाचा शेला परिधान केला होता.

All Photos: Instagram

वयाच्या १५व्या वर्षी अक्षयच्या लेकाने सोडले घर