केस गळती कमी करण्यासाठी बेस्ट हेअर पॅक

By Hiral Shriram Gawande
May 21, 2023

Hindustan Times
Marathi

तुम्हीही हेअर फॉलच्या समस्येचे त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांनी तयार केलेले हेअर पॅक केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या मुळापासून नाहीशी करू शकता. 

केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही होममेड हेअर पॅक कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

२ चमचे खोबरेल तेल ४ चमचे एलोवेरा जेलमध्ये मिक्स करा. या मिश्रणाने केसांना हलक्या हातांनी मसाज करा. ३० मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. 

तुमच्या केसांच्या प्रमाणानुसार १-२ अंडी फेटा आणि त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑइल घाला. ते टाळू आणि केसांवर लावा. २०-३० मिनिटांनंतर केस धुवा. 

पिकलेल्या केळीमध्ये २ चमचे मध मिसळून पेस्ट बनवा. आता हा हेअर पॅक केसांना लावा आणि ३० मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. 

२-३ चमचे खोबरेल तेलात कढीपत्ता घालून काही मिनिटे परतून घ्या. या तेलाने केसांना हलक्या हातांनी मसाज करा. ३० मिनिटांनी केस धुवा. 

केस गळती कमी करण्यासाठी कांद्याच्या रसात १-२ चमचे मध मिसळून केसांना लावा. ३० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा. 

दही आणि लिंबू हेअर पॅक केस गळती कमी करू शकतात. यासाठी २ चमचे दह्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. ३० मिनिटांनी केस धुवा. 

२ चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. दुसख्या दिवशी सकाळी भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांची बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये २ चमचे खोबरेल तेल घाला

हा हेअर पॅक टाळूवर आणि केसांना नीट लावा. साधारण २०-३० मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. 

हे आहेत काळी मिरीचे औषधी फायदे

pixabay