पाचगणी हिल स्टेशन उन्हाळ्यात फिरण्यासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. पाचगणी समुद्र तळापासून १३३४ मीटर उंचीवर आहे. विकेंड दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात.
अमरावती शहराला देवांचा राजा इंद्रदेवाचे शहर मानले जाते. अमरावतीत तुम्हाला
फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. येथील वातावरण तुमचे मन जिंकेल.
महाराष्ट्रात पुणे हे पर्यटकांचे सर्वात आवडीचे ठिकाण आहे. पुण्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी किल्ले, बागा, डोंगर, सह्याद्री कडा, मंदिरे आदि ठिकाणे आहेत.
नाशिक शहर हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन शहर आहे. येथे देशातीलच नाही तर परदेशातील नागरिक देखील भेटी देण्यासाठी येतात. या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक जागा आहेत.
महाराष्ट्रात फिरण्यासाठी मुंबई सर्वात आवडीचे ठिकाण आहे. येथील गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी देवस्थान राज्यातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
लोणावळा हे पुण्याजवळील थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले डोंगर दऱ्या तुम्हाला मोहित करून टाकतील. येथे फिरण्याची अनेक ठिकाणे आहेत.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
छत्रपती संभाजी नगर येथे अजंता आणि एलोरा लेण्या पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. एप्रिल महिन्यात तुम्ही या ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करू शकतात.