सपाटून आपटलेत अमिताभ बच्चन यांचे ‘हे’ चित्रपट!

By Harshada Bhirvandekar
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, आमिर खान, कतरिना कैफ असे अनेक कलाकार होते. मात्र, हा चित्रपट आपली जादू दाखवू शकला नाही. 

‘बुड्ढा होगा तेरा बाप’ या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत हेमा मालिनी आणि सोनू सूद हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही.

‘लाल बादशहा’ या चित्रपटात आपल्या आई-वडिलांपासून वेगळ्या झालेल्या एका मुलाची कहानी दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील गाणी गाजली, मात्र चित्रपट चालू शकला नाही. 

अमिताभ बच्चन यांचा ‘शमिताभ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या चित्रपटात धनुष्यची देखील महत्त्वाची भूमिका होती.  

कतरिना कैफचा डेब्यू चित्रपट ‘बुम’मध्ये अमिताभ बच्चन देखील होते. या चित्रपटाची कथा अंडरवर्ल्डशी निगडित होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजिबातच चालला नाही.  

अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय स्टारर ‘क्यू हो गया ना’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप म्हटले गेलेले.

अमिताभ बच्चन यांचा ‘एकलव्य’ देखील जोरात आपटला होता. या चित्रपट एका शाही परिवार आणि त्यांच्या विश्वासू सेवकाची कथा होती. 

अमिताभ बच्चन यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटात साठ वर्षांचा वृद्ध आणि अठरा वर्षांची तरुण मुलगी यांच्यातील प्रेमकथा दाखवण्यात आली होती. मात्र, हा चित्रपट लोकांना आवडला नव्हता.  

१९९०मध्ये रिलीज झालेल्या ‘अजूबा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी सुपर हिरोची भूमिका केली होती. मात्र, हा चित्रपट सपाटून आपटला होता. 

‘आग’ हा चित्रपट २००७मध्ये रिलीज झाला होता. ‘शोले’चा रिमेक असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला होता.

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या