INDIAN Metro मध्ये विकायला आली बिर्याणी, नारळ, वडापाव अन् मासे, फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकीत

sahixd instagram

By Shrikant Ashok Londhe
May 30, 2023

Hindustan Times
Marathi

आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वाढत्या ट्रेंड दरम्यान पुन्हा एकदा मेट्रोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे फोटो AI Artist Shahid ने Midjourney AI Tool च्या माध्यमातून डिझाईन केले आहेत.

या फोटोंमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातील मेट्रोंमध्ये तेथील वैशिष्ट्यांना प्रतिबिंबित केले आहे.

हैदराबादचे नाव समोर येताच बिर्याणीची आठवण येते. त्यामुळे हैदराबाद मेट्रोच्या एआय इमेजेसमध्ये बिर्याणी वाटप करताना दिसत आहे.

वर्ल्ड फेमस आयटी सिटी बंगळुरूच्या मेट्रोमध्ये आयटी आणि कॉर्पोरेट प्रोफेशनल्सना दाखवण्यात आले आहे.

बिहारमध्ये विविध सण-उत्सवाला बनवण्यात येणारा ठेकुआ आता बिहार मेट्रोमध्ये दाखल झाला आहे.

यूपी मेट्रोच्या फोटोत दबंगांना मेट्रोतून प्रवास करताना दाखवले आहे.

काश्मीरच्या मेट्रो जोरदार बर्फवृष्टी होत असताना प्रवासी प्रवास करताना दाखवले आहेत.

उडिशा आपली संस्कृती व परंपरेसाठी जगप्रसिद्ध आहे. यामुळे उडिशा मेट्रो स्थानिक कलाकृतींपासून डिझाईन केली आहे.

संत्र्यांसाठी प्रसिद्ध नागपूर मेट्रोही संत्र्यांनी भरलेली दाखवलेली आहे.

गुजरात मेट्रोमध्ये ढोकळा भरलेला दाखवला आहे.

मुंबई व वडापावचे नाते जगजाहीर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई मेट्रो आणि वडापाव यांचे नातेही घट्ट झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

sahixd instagaram

भिंतीवरील कोणत्या रंगांचा अर्थ काय?