IPL मधील ५ सर्वात मोठे रनचेस

By Rohit Bibhishan Jetnavare
Apr 17, 2024

Hindustan Times
Marathi

IPL २०२४च्या ३१व्या सामन्यात (१६ एप्रिल) एक असामान्य गोष्ट घडली.

राजस्थान आणि केकेआर यांच्यातील हा सामना ईडन गार्डनवर खेळला गेला.

या सामन्यात राजस्थानने केकेआरचे २२४ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पूर्ण केले.

IPLच्या इतिहासातील हे सर्वात मोठे रनसेच आहे. या निमित्ताने आपण IPL मधील सर्वात मोठे ५ रनचेस कोणते, ते पाहणार आहोत.

राजस्थान वि. पंजाब, (२०२०)

२०२० मध्ये शारजाहच्या मैदानावर पंजाबने राजस्थानसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते राजस्थानने पूर्ण केले.

राजस्थान वि. कोलकाता, (२०२४)

यंदा १६ एप्रिलच्या रात्री राजस्थान रॉयल्सने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कोलकाताचे २२४ धावांचे लक्ष्य २ विकेट्स राखून पार केले.

मुंबई वि चेन्नई, (२०२१)

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले. आयपीएलचे हे तिसरे सर्वात मोठे रनसेच आहे.

राजस्थान वि. डेक्कन चार्जर्स (२००८)

राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सच्या २१५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. 

२०२३ मध्ये मोहाली येथे मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचे २१५ धावांचे लक्ष्य ठेवले सहज गाठले होते.

मुंबई वि पंजाब, (२०२३)

पचन शक्ती बूस्ट करण्यासाठी चहामध्ये घाला हे मसाले!