मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant: 'ऋषभ पंतला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर ठेवणंच भारतासाठी चांगले होईल'

Rishabh Pant: 'ऋषभ पंतला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर ठेवणंच भारतासाठी चांगले होईल'

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 20, 2022 06:45 PM IST

wasim jaffer on rishabh pant t20 world cup: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंतची बॅट शांतच राहिली आहे. आयपीएलपासून आतापर्यंत त्याने १४ डाव खेळले आहेत. या दरम्यान त्याने केवळ २२.८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये पंतने या १४ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

Rishabh Pant
Rishabh Pant

भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक मोठे विधान केले आहे. जाफरचे हे धक्कादायक विधान आगामी T20 विश्वचषकासाठी भारताच्या संघ संयोजनाबाबत आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला टी-२० वर्ल्डकपच्या संघातून बाहेर ठेवणे हे संघाच्या भल्याचे ठरेल, असे जाफरने म्हटले आहे.

ESPNcricinfo शी बोलताना जाफर म्हणाला की, "मला वाटते की अक्षर पटेलने अलीकडच्या काळात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावर विश्वास का नाही, याची मला कल्पना नाही. अक्षरने आपल्या फलंदाजीने अनेक सामने जिंकवले आहेत'.

तसेच, “ भारतीय थिंक टँक ऋषभ पंतच्या समावेशाबाबत खूप विचार करत आहे. तो चांगला खेळाडू आहे. मी याबद्दल अनेकदा बोललो आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पंतने उत्कृष्ट काही डाव खेळले आहेत. परंतु T20 आंतरराष्ट्रीय मध्ये त्याची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे".

सोबतच जाफर पुढे म्हणाला की, “भारतीय मॅनेजमेंटला हे देखील शोधण्याची गरज आहे की, त्यांना ऋषभ पंतला खेळवायचे आहे की दिनेश कार्तिकला संधी द्यायची आहे. कार्तिकने इंडियन प्रीमियर लीगपासून खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी ऋषभ पंत चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर बसत नाही. सलामीची फलंदाजी ही त्यांची सर्वोत्तम स्थिती आहे, जी होईल असे मला वाटत नाही. मला वाटते की ऋषभ पंतला विश्वचषकात बाहेर ठेवणे ही सर्वात चांगली गोष्ट असेल.

पंतची टी-२० मधील कामगिरी

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंतची बॅट शांतच राहिली आहे. आयपीएलपासून आतापर्यंत त्याने १४ डाव खेळले आहेत. या दरम्यान त्याने केवळ २२.८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये पंतने या १४ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेले नाही. अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाल्याने पंतला भारतीय संघात संधी मिळाली. पण जर भारताने अक्षर पटेलसोबत सातव्या क्रमांकावर जाण्याचा निर्णय घेतला तर कार्तिकला त्याच्यावर संधी मिळू शकते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या