मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sehwag on Kohli: सेहवागचे 'हे' ट्विट विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा?

Sehwag on Kohli: सेहवागचे 'हे' ट्विट विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 11, 2022 04:09 PM IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म सध्या खूप चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताच्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे.

VIRAT KOHLI
VIRAT KOHLI

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) सध्या वाईट काळातून जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. दुसऱ्या टी-20 सामन्यात एका नवख्या गोलंदाजाने कोहलीची विकेट घेतली. या सामन्यातही विराट अपयशी ठरल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांनीही विराटवर टीका केली होती. विराटऐवजी आता युवा खेळाडूंना संघात आजमावण्याची वेळ आली आहे, असे मत कपिल देव (kapil dev) यांनी व्यक्त केले होते.

तसेच, आता भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यानेही विराट कोहलीबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले आहे.

सेहवागने ट्विटरवर लिहिले की, 'भारताकडे असे अनेक फलंदाज आहेत जे सुरुवातीपासूनच वेगाने खेळू शकतात, परंतु ते खेळाडू दुर्दैवाने बाहेर बसले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फॉर्मनुसार भारतीय टीम मॅनेजमेंटला लवकरच मोठा निर्णय घ्यावा लागेल."

दरम्यान, रोहित शर्माने विराटचा सातत्याने बचाव केला आहे. तर सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आदी खेळाडू विराटच्या नंबर तीनच्या जागेवर चांगली कामगिरी करु शकतात.

कपिल देव काय म्हणाले होते-

यापूर्वी माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले होते की, कोहलीला आता संघाबाहेर बसवण्याची वेळ आली आहे. सोबतच ते म्हणाले होते की, जर जगातील नंबर २ चा गोलंदाज अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर जगातील नंबर १ च्या फलंदाजालाही वगळले जाऊ शकते". तसेच, विराट जर सतत अपयशी ठरत असेल तर तुम्ही बाकीच्या युवा खेळाडूंना संघाबाहेर ठेवू शकत नाही|, असेही कपिल देव म्हणाले होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या