मराठी बातम्या  /  क्रीडा  /  सामना सुरू असताना नग्न व्यक्ती थेट मैदानात घुसली आणि... वाचा लॉर्ड्सवर काय घडलं?

सामना सुरू असताना नग्न व्यक्ती थेट मैदानात घुसली आणि... वाचा लॉर्ड्सवर काय घडलं?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 04, 2022 04:13 PM IST

ऐतिहासिक लॉर्ड्स (Lord's) मैदानावर आजच्या दिवशी१९७५ साली एका व्यक्तीने नग्न अवस्थेत खेळपट्टीकडे धाव घेतली होती. त्या नंतर त्याला अटक करण्यात आली होती. दंडाधिकाऱ्यांनी त्याला १० पाऊंडचा दंड ठोठावला होता. जो त्याने पैज जिंकून कमावला होता.

संग्रहीत फोटो
संग्रहीत फोटो

खेळादरम्यान मैदानावर 'स्ट्रीकर'ची एन्ट्री ही काही नवीन गोष्ट नाही. (एखादा प्रेक्षक जेव्हा आपले सर्व कपडे काढून मैदानात प्रवेश करतो आणि खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतो.) त्याला स्ट्रीकर म्हणतात. खेळादरम्यान अनेकवेळा प्रेक्षक उत्साह किंवा मजामस्तीमुळे अशी कृत्ये करतात.

क्रिकेटमध्ये पहिला स्ट्रीकर हा आजच्याच दिवशी म्हणजे ४ ऑगस्ट १९७५ (४७ वर्षांपूर्वी) मैदानात उतरला होता. तोही चक्क क्रिकेटच्या पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अॅशेज मालिकेतील दुसऱ्या कसोटीत हा स्ट्रीकर मैदानात धावत आला, तेव्हा सर्वजण थक्क झाले होते. या स्ट्रीकरचे नाव मायकेल अँजेलो असे होते. तो मर्चंट नेव्हीमध्ये कुक होता.

मात्र, मायकेल अँजेलो (michael angelo) हा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला स्ट्रीकर नव्हता. असाही दावा अनेकजण करतात. त्या दिवसापासून वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलिया-न्युझीलंड कसोटीदरम्यान असाच प्रकार दोनदा घडल्याचे अनेक जण सांगतात.

दरम्यान, पहिला स्ट्रीकर अशी ओळख असलेल्या मायकल अँजेलोविषयीचे अनेक किस्से क्रिकेट वर्तूळात चर्चिले जातात.

अॅशेज मालिकेतील दुसरी कसोटी लॉर्ड्सवर ३१ जुलै ते ५ ऑगस्ट १९७५ या कालावधीत सुरु होती. कसोटीचा चौथा दिवस खूपच कंटाळवाणा जात होता. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३९९/६ धावा केल्या होत्या. बॉब वूल्मर आणि अॅलन नॉट क्रीजवर होते. त्याचवेळी २४ वर्षीय मायकल अँजेलो आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून मैदानात धावत आला. त्यावेळी सुस्तावलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यातली झोप अचानक उडून गेली. मैदनावरचे विचित्र दृष्य पाहून सर्वजण थक्क झाले.

<p>michael angelo</p>
michael angelo

लॉर्ड्सच्या नर्सरीच्या एंडमधून प्रवेश केलेल्या स्ट्रीकरला माउंट स्टँडच्या एंडला सुरक्षा रक्षकांनी घेरले आणि मैदानाबाहेर काढले. शेवटी दंडाधिकाऱ्यांनी त्याला १० पाउंडचा दंड ठोठावला. विशेष म्हणजे नग्न होऊन मैदानात उतरण्याची पैज जिंकल्यानंतर त्याला तेवढेच पौंड मिळाले होते.

त्यानंतर काही वर्षांनी त्या घटनेची आठवण करून देताना मायकल म्हणाला होता, 'तो सामना खूप कंटाळवाणा होता. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसोबत थोडी मजा मस्ती सुरु होती. मी पीत होतो, पण जास्त नाही... तसे असते तर मला स्टंपवर उडी मारता आली नसती. मला यापेक्षा जास्त आठवत नाही".

 

WhatsApp channel