मराठी बातम्या  /  क्रीडा  /  स्मृती मानधना रोहित-विराटच्या क्लबमध्ये, तर हरमनप्रीत कॅप्टन्सीत धोनीच्या पुढे

स्मृती मानधना रोहित-विराटच्या क्लबमध्ये, तर हरमनप्रीत कॅप्टन्सीत धोनीच्या पुढे

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 31, 2022 08:47 PM IST

स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

harmanpreet kaur
harmanpreet kaur

स्मृती मानधनाच्या शानदार अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ८ विकेट्सनी धुळ चारली. पाकिस्तानने प्रथम खेळताना ९९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य ११.४ षटकात पूर्ण केले.

धावांचा पाठलाग करताना मंधानाने तिच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक झळकावले. स्मृती ४२ चेंडूत ६३ धावा करून नाबाद राहिली. सामन्यात तिने १५० च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा केल्या. या खेळीत तिने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. स्मृतीने केवळ चौकार षटकारांच्या साह्यानेच ५० हून अधिक धावा केल्या. शेफाली वर्मासोबत तिने पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली.

धावांचा पाठलाग करताना १ हजार धावा पूर्ण-

<p>Smriti Mandhana</p>
Smriti Mandhana

यासह २६ वर्षीय स्मृती मानधनाने लक्ष्याचा पाठलाग करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने ४० डावात ३२ च्या सरासरीने १ हजार ५९ धावा केल्या आहेत. यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे.

पुरुषांच्या क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर केवळ विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेच लक्ष्याचा पाठलाग करताना T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १ हजारहून अधिक धावा करू शकले आहेत. म्हणजेच मंधाना आता कोहली आणि रोहितच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. कोहलीने ४० डावात १ हजार ७८९ धावा केल्या आहेत, तर रोहितने ५७ डावात १ हजार ३७५ धावा केल्या आहेत.

<p>virat and rohit&nbsp;</p>
virat and rohit&nbsp;

स्मृती मंधानाने T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ८९ सामन्यांत ८७ डावांत २७ च्या सरासरीने २ हजार १२० धावा केल्या आहेत. यात १५ अर्धशतकांचा समावेश आहे.तर ८६ धावा ही तिची सर्वोच्च खेळी आहे. भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार हरमनप्रीत कौरने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १२६ सामन्यांच्या ११३ डावात २४६३ धावा केल्या आहेत. यात तिने एक शतक आणि ७ अर्धशतकं झळकावली आहेत. त्याचबरोबर माजी कर्णधार मिताली राज दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 89 सामन्यांच्या ८४ डावात २३६४ धावा केल्या आहेत. मितालीने १७ अर्धशतके केली आहेत.

कर्णधार म्हणून हरमनचा ४२ वा विजय, धोनीला मागे सोडले-

<p>Harmanpreet Kaur</p>
Harmanpreet Kaur

कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा ४२ वा विजय आहे. पुरुष किंवा महिला गटात भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारी ती कर्णधार ठरली आहे. हरमनने एमएस धोनीला मागे सोडले आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत ७१ सामन्यांत ४२ सामने जिंकले आहेत. तर २६ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

<p>ms dhoni</p>
ms dhoni

एमएस धोनीबद्दल बोलायचे तर, त्याने कर्णधार म्हणून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७२ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. २८ सामन्यात पराभव झाला आहे. सोबतच विराट कोहली ३० विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर तर रोहित शर्मा २७ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून ३२ पैकी १७ सामने जिंकले आहेत. ती हरमनप्रीतनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

WhatsApp channel