मराठी बातम्या  /  क्रीडा  /  BCCI Title Sponsership: बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील

BCCI Title Sponsership: बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर, धोनी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या कंपनीशी डील

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 05, 2022 06:48 PM IST

Title Sponsorship Rights For BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशांतर्गत सामन्यांसाठी मास्टरकार्डला टायटल स्पॉन्सर्स म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी बोर्डाने मास्टरकार्डशी करार केला आहे. यापूर्वी पेटीएमकडे हे अधिकार होते.

Mastercard
Mastercard

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय देशांतर्गत सामन्यांसाठी मास्टरकार्डला टायटल स्पॉन्सर्स म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी बोर्डाने मास्टरकार्डशी करार केला आहे. यापूर्वी पेटीएमकडे हे अधिकार होते.

BCCI ने केलेल्या या करारानुसार, मास्टरकार्ड आता भारतात आयोजित सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धा प्रायोजित करेल. यामध्ये इराणी करंडक, दुलीप करंडक आणि रणजी करंडक यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे. यासोबतच भारतात होणाऱ्या सर्व ज्युनियर क्रिकेट स्पर्धा (19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील) मास्टरकार्डद्वारे प्रायोजित केल्या जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी याची घोषणा केली.

मास्टरकार्डने भारतीय प्रेक्षकांपर्यंत आपली धोरणात्मक पोहोच वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) सोबत पार्टनरशीपची घोषणा केली आहे. मास्टरकार्ड हे जगभरात एक मोठे नाव आहे आणि त्यांनी UEFA चॅम्पियन्स लीग, ग्रॅमी, कान्स फिल्म फेस्टिव्हल, ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा यांसारख्या प्रमुख स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत.

धोनी मास्टरकार्डचा ब्रँड अॅम्बेसेडर

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या चार वर्षांपासून मास्टरकार्डचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यावेळी तो म्हणाला - क्रिकेट हे माझे जीवन आहे आणि माझ्याकडे जे काही आहे ते सर्व क्रिकेटनेच मला दिले आहे. मास्टरकार्ड सर्व बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट सामने आणि विशेषत: देशांतर्गत, कनिष्ठ आणि महिला क्रिकेटचे प्रायोजकत्व करत आहे, याचा मला आनंद आहे. आजचे रणजी आणि कनिष्ठ खेळाडू उद्या देशासाठी खेळतील आणि १.३ अब्ज भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक राहतील".

 

WhatsApp channel