मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: बुमराह पती-पत्नीने इंग्लंडला रडवले, संजना गणेशनचा 'हा' व्हिडीओ पाहा

IND vs ENG: बुमराह पती-पत्नीने इंग्लंडला रडवले, संजना गणेशनचा 'हा' व्हिडीओ पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 13, 2022 03:21 PM IST

बुमराहने सहा विकेट घेत फलंदाजीचे कंबरडे मोडले. यात त्याने तीन फलंदाजांना तर खातेही उघडू दिले नाही. यानंतर संजना गणेशन हिने 'क्रिस्पी डक' नावाच्या दुकानासमोर एक मजेशीर व्हिडिओ बनवला आहे.

sanjana ganesan
sanjana ganesan

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने १९ धावांत ६ विकेट घेतल्या. बुमराहशिवाय मोहम्मद शमीनेही शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे इंग्लंडचा संघ ११० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने एकही विकेट न गमावता लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची नाबाद खेळी खेळली. शिखर धवनही दुसऱ्या टोकाला ३१धावांवर नाबाद राहिला.

या सामन्यात जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. या षटकात त्याने एकही धाव दिली नाही. त्याने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जेसन रॉयला क्लीन बोल्ड केले, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर जो रुटलाही ऋषभ पंतने झेलबाद केले. त्यानंतर त्याने जॉनी बेअरस्टो (७ धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले. लिव्हिंगस्टोनलाही आपले खाते उघडता आले नाही. कार्स त्याचा पाचवा तर डेव्हिड विली सहावा बळी ठरला.

जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांनी इंग्लंडची चांगलीच मजा घेतली. प्रथम बुमराहने सहा विकेट घेत फलंदाजीचे कंबरडे मोडले. यात त्याने तीन फलंदाजांना तर खातेही उघडू दिले नाही. यानंतर संजना गणेशन हिने 'क्रिस्पी डक' नावाच्या दुकानासमोर एक मजेशीर व्हिडिओ बनवला आहे. या सामन्यात इंग्लंडचे चार महत्त्वाचे फलंदाज शुन्यावर बाद झाले यावरुन संजनाने त्यांची मजा घेत 'क्रिस्पी डक' नावाच्या दुकानासमोर व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तिने इंग्लंड संघाची खूपच मजा घेतली.

या सामन्यात जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन शून्यावर बाद झाले. संजनाने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "ती एका अशा दुकाना समोर आहे ज्या ठिकाणी सध्या इंग्लंडचे फलंदाज येऊ इच्छित नाहीत. कारण त्यांना 'क्रिस्पी डक' म्हणतात. आम्हाला आता एक 'डक रॅप' मिळाला आहे . मैदानाबाहेरील डक कसा आहे हे आम्हाला पहायचे होते.  कारण मैदानावरील 'डक' तर शानदार होते".

 

 

WhatsApp channel