मराठी बातम्या  /  क्रीडा  /  एजबॅस्टन कसोटी दरम्यान शास्री 'हे' काय बोलून बसले, राहुल द्रविडबाबत मोठं वक्तव्य

एजबॅस्टन कसोटी दरम्यान शास्री 'हे' काय बोलून बसले, राहुल द्रविडबाबत मोठं वक्तव्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 03, 2022 07:15 PM IST

टीम इंडियाच्या कोचपदासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगली व्यक्ती कुणी असूच शकत नाही, असे माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी म्हटले आहे.

rahul dravid
rahul dravid

माजी क्रिकेटर रवी शास्त्री टीम इंडियाचे यशस्वी प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकल्या. तसेच, इंग्लंडमधील मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र, आयसीसी इव्हेंन्टमध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देण्यात ते अपयश ठरले.

दरम्यान, एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर रवि शास्त्रींना आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. तसेच, सध्याचा टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड त्या पदासाठी कसा योग्य व्यक्ती आहे, याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, "टीम इंडियाच्या कोचपदासाठी राहुल द्रविडपेक्षा चांगली व्यक्ती कुणी असूच शकत नाही. मी चुकून टीम इंडियाचा कोच बनलो, कोच बनण्याआधी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये होतो, त्यानंतर मला मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यास सांगितले गेले. तर द्रविड हा एका प्रक्रियेअंतर्गत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. त्याने दीर्घकाळ अंडर-१९ संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्याला कोचिंगचा भरपूर अनुभव आहे".

शास्त्री यांच्या कोच पदाच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीवर पराभव केला, भारताने सलग दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. याशिवाय आफ्रिकेच्या भूमीवर एक कसोटी सामनाही जिंकला. या दरम्यान भारताचा संघ कसोटीत नंबर-१ देखील ठरला. मात्र, शास्त्री यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात भारतीय संघाला एकही विश्वचषक किंवा आयसीसीची स्पर्धा जिंकता आलेली नाही. शास्त्री कोच असताना भारताने एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठली होती.

दरम्यान, शात्रींनी पुढे सांगितले की, भारतीय मीडिया ही भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला भरपूर त्रास देते. मला फक्त मीडियाचीच भिती वाटायची. ते त्यांच्या मतानुसार बातम्या देत असतात. पण खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होत असेल, तर मीडियाला तुमच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही शास्त्री म्हणाले.

WhatsApp channel