मराठी बातम्या  /  क्रीडा  /  जसप्रीत बुमराहला ICC कडून खास गिफ्ट, ‘या’ विशेष सन्मानासाठी मानले आभार

जसप्रीत बुमराहला ICC कडून खास गिफ्ट, ‘या’ विशेष सन्मानासाठी मानले आभार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 10, 2022 07:25 PM IST

बुमराहने या सन्मानासाठी आयसीसीचे आभार मानले आहेत.

jaspreet bumrah
jaspreet bumrah

टीम इंडियाचा (team india) सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहने (jaspreet bumrah) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोत बुमराहच्या हातात एक लाल रंगाची कॅप आहे. ही कॅप आयसीसी टी 20 आंतरराष्ट्रीय दशकातील सर्वोत्तम (ICC Team Of The Decade)  संघाची आहे. आयसीसीने २०२० मध्ये दशकातील तिन्ही फॉरमॅटमधील (टेस्ट,वनडे, टी-२०) सर्वोत्तम संघांची निवड केली होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली हा या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम संघाचा भाग आहे.

दरम्यान, तब्बल १८ महिन्यांनंतर आयसीसीने बुमराहला त्याची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने या सन्मानासाठी आयसीसीचे आभार मानले आहेत.

दशकातील सर्वोत्तम संघात रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यातील विराट हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याचा तिन्ही संघात समावेश आहे. त्याच्याकडे कसोटी संघाचे तर महेंद्रसिंह धोनीकडे टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांचा वनडे आणि टी-२० संघात समावेश आहे.

सर्वोत्तम टी-२० संघ-

रोहित शर्मा- (भारत)

ख्रिस गेल, (वेस्ट इंडिज)

एरॉन फिंच, (ऑस्ट्रेलिया)

विराट कोहली, (भारत)

एबी डिव्हिलियर्स, (दक्षिण आफ्रिका)

ग्लेन मॅक्सवेल, (ऑस्ट्रेलिया)

महेंद्र सिंह धोनी (कर्णधार),(भारत)

कायरन पोलार्ड, (वेस्ट इंडिज)

राशिद खान, (अफगाणिस्तान)

जसप्रीत बुमराह,(भारत)

लसित मलिंगा (श्रीलंका)

 

जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतीय टी २० संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ५७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात बुमराहने ६.५१ च्या सरासरीने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने श्रीलंकेविरूद्ध फेब्रुवारीत आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या