मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Impact Player rule: टी-२० क्रिकेट आणखी रंगतदार होणार; बीसीसीआय आणणार 'हा' नवा नियम

Impact Player rule: टी-२० क्रिकेट आणखी रंगतदार होणार; बीसीसीआय आणणार 'हा' नवा नियम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 19, 2022 02:43 PM IST

Impact Player rule BCCI: टी-20 क्रिकेटला आणखी रंजक बनवण्यासाठी बीसीसीआय आता 'इम्पॅक्ट प्लेयर' हा नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार ११ ऐवजी १५ खेळाडू सामन्यात खेळण्यास पात्र असतील. म्हणजेच चालू सामन्यात 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम वापरून प्लेइंग-११ मधून एक खेळाडू बदलला जाऊ शकतो.

team india
team india

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार सामन्यात ११ ऐवजी १५ खेळाडू खेळण्यास पात्र असतील. या नियमाला 'इम्पॅक्ट प्लेयर' असे नाव देण्यात आले आहे. या नव्या नियमाच्या पडताळणीसाठी BCCI तो प्रथम देशांतर्गत क्रिकेटमध्ये लागू करणार आहे.

असा नियम फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलसारख्या खेळांमध्ये वापरण्यात येतो. बीसीसीआयने हा नियम आता सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर येत्या काळात आयपीएलमध्येही या नियमाचा वापर होताना दिसेल.

असा आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम

नाणेफेकी दरम्यान कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनसह इतर ४ खेळाडूंची नावे द्यावी लागतील. या चार खेळाडूंपैकी कर्णधार कोणत्याही एका खेळाडूला पर्याय म्हणून संघात सामन्या दरम्यान संधी देऊ शकतो.

उदा.- प्रथम फलंदाजी करताना संघाने लवकर विकेट गमावल्यास, 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाच्या साहाय्याने ते एका गोलंदाजाच्या जागी एक अतिरिक्त फलंदाज म्हणून बदली खेळाडू आणू शकतात.

सोबतच, प्रथम फलंदाजी करताना संघाने जास्त विकेट गमावल्या नाहीत, तर दुसऱ्या डावात कर्णधार एका फलंदाजाऐवजी अतिरिक्त गोलंदाजाचा संघात समावेश करू शकतो.

ज्या खेळाडूच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेअर संघात सामील होईल. त्या खेळाडूला पुन्हा मैदानात येता येणार नाही.

'इम्पॅक्ट प्लेअर' नियम वापरण्यापूर्वी कर्णधाराला फील्ड अंपायर किंवा फोर्थ अंपायरला कळवावे लागेल.

बीसीसीआयच्या नियमांनुसार, सामन्यादरम्यान दोन्ही संघ डावाच्या १४ व्या षटकाच्या आधी 'इम्पॅक्ट प्लेयर' वापरण्यास सक्षम असतील. म्हणजेच यानंतर हा नियम वापरला जाणार नाही.

WhatsApp channel

संबंधित बातम्या