मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IBPS PO Notification 2022: ६४३२ पदांसाठी भरती! अर्जप्रक्रिया आजपासून झाली सुरू

IBPS PO Notification 2022: ६४३२ पदांसाठी भरती! अर्जप्रक्रिया आजपासून झाली सुरू

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Aug 02, 2022 11:18 AM IST

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक पिओच्या एकूण ६४३२ पदांसाठी भरती करण्यात आली आहे.

नोकरीची संधी
नोकरीची संधी (HT)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँक पीओ च्या एकूण ६४३२ पदांची भरती करण्यात आली आहे . Iइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या अधिकृत साईट ibps.in वर आजपासून (२ ऑगस्ट) अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट 2022 आहे. शुल्क जमा करण्याचीही ही शेवटची तारीख आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन पिओ प्रिलिम्स परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये घेतली जाईल. हीच मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतली जाईल.

१. रिक्त पदे आणि आरक्षण

एकूण ६४३२ पदांची भरती होणार आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी २५९६ जागा आहेत. OBC साठी १७४१, SC साठी ९९६, ST साठी ४८३ आणि EWS प्रवर्गासाठी २५९६ जागा राखीव आहेत.

२.पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी आवश्यक.

३. वयोमर्यादा

अर्जदाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म ०२ ऑगस्ट १९९२ च्या आधी आणि ०१ ऑगस्ट २००२ नंतर झालेला नसावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात तीन वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट असेल.

४. ‘या’ बँकांमध्ये भरती होणार

या अधिसूचनेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मधील प्रोबेशनरी ऑफिसर / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

५. कोणत्या बँकेत किती जागा रिक्त आहेत?

<p>रिक्त जागांचा तपशील</p>
रिक्त जागांचा तपशील

६. निवड प्रक्रिया

प्रिलिम्समधील कामगिरीच्या आधारे मेन्सासठी बोलावले जाईल. मेन्समध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

७. प्रिलिम्स परीक्षा

इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि रिझनिंगचे प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये ३० गुणांचे ३० प्रश्न असतील जे २० मिनिटांत सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूडमध्ये २० मिनिटांत ३५ गुणांचे ३५ प्रश्न असतील. रिझनिंगमध्येही ३५ गुणांचे ३५ प्रश्न असतील जे २० मिनिटांत करून पाहावे लागतील. म्हणजेच १०० गुणांचे १०० प्रश्न असतील. मेन्समध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्यूड, जनरल/इकॉनॉमी/बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि डेटा अॅनालिसिस आणि इंटरप्रिटेशन या विषयांवर प्रश्न असतील.

८. अर्जाची प्रक्रिया

अर्ज करण्यापूर्वी, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, स्कॅन केलेली हाताने लिहिलेली घोषणा ठेवा. आता www.ibps.in ला भेट देऊन अर्ज करा. “CRP-PO/MTs-XII साठी सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज करा. अर्ज करताना तुम्हाला स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि घोषणा अपलोड करावी लागेल.

९. महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - २ ऑगस्ट २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ ऑगस्ट २०२२

ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख - २२ ऑगस्ट २०२२

पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी कॉल लेटर - सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२

 पूर्व परीक्षा प्रशिक्षण - सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२

प्रिलिम्स कॉल लेटर - ऑक्टोबर, २०२२

प्रिलिम्स परीक्षेची तारीख - ऑक्टोबर २०२२

प्रिलिम्स निकाल २०२२- नोव्हेंबर २०२२

मुख्य कॉल लेटर - नोव्हेंबर, २०२२

मुख्य परीक्षेची तारीख - नोव्हेंबर २०२२

मुख्य परीक्षेचा निकाल - डिसेंबर २०२२

मुलाखत - फेब्रुवारी/मार्च २०२२

मुलाखतीसाठी कॉल लेटर - जानेवारी/फेब्रुवारी, २०२३

१०. अर्ज शुल्क

सामान्य, OBC आणि EWS श्रेणी - ८५० रु

SC, ST आणि दिव्यांग - १७५ रु.

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेटद्वारे फी भरता येईल.

 

IPL_Entry_Point