मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi: भारत जोडो यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले! सांगितला पदयात्रेचा अर्थ

Narendra Modi: भारत जोडो यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले! सांगितला पदयात्रेचा अर्थ

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 21, 2022 05:27 PM IST

Narendra Modi: तुम्ही तुमच्या यात्रेत नर्मदा योजनेला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांच्यासोबत चालत आहात. गुजरातच्या येणाऱ्या आगामी निवडणुकीत याची शिक्षा तुम्हाला नक्की मिळेल असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत जोडो यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले! सांगितला पदयात्रेचा अर्थ
भारत जोडो यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले! सांगितला पदयात्रेचा अर्थ

Narendra Modi: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच थेट निशाणा साधला. त्यांनी राहुल गांधींवर टीका करतानाम्हटलं की, ज्या लोकांना जनतेने सत्तेतून बाहेर ढकललं आहे ते आता सत्तेत येण्यासाठी यात्रा काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगधरा इथं एका सभेत बोलत होते. तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ही पदयात्रा नाही तर पदासाठी यात्रा आहे.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, काँग्रेस मोदींना त्यांची पात्रता दाखवून देऊ अशा घोषणा देत आहे. तुम्ही एका राजघराण्याचा पक्ष आहात आणि मी एका सामान्य कुटुंबातला मुलगा. तुम्ही आधी मला मौत का सौदागार, गटारातला कीडा, नीच अशा नावांनी हिणवलंत पण आता तुम्हाला पात्रतेच्या या खेळापासून बाजूला जात गेल्या दोन दशकात गुजरातमध्ये भाजपच्या विकासकामांवर चर्चा करावी लागेल.

सौराष्ट्रमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सुरेंद्रनगरमध्ये मोठ्या सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, दोन दशकात माझ्या नावावर काही पात्रता नाही तरीही मी सेवक आहे. काँग्रेसने सुरेंद्रनगरच्या लोकांना ४० वर्षे तहानलेलं ठेवलं. आता तुम्ही तुमच्या यात्रेत नर्मदा योजनेला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांच्यासोबत चालत आहात. गुजरातच्या येणाऱ्या आगामी निवडणुकीत याची शिक्षा तुम्हाला नक्की मिळेल.

गुजरात निवडणुकीवर राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांनी केलेल्या भाष्यावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली. ते म्हणाले की, राज्यात निवडणुकीबाबत राजकीय विश्लेषकांच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदु हा सत्तेच्या विरोधातील लाट असते. मात्र गुजरातच्या लोकांनी गेल्या दोन दशकात हा राजकीय विधी बदलला आहे. गुजरातच्या मतदारांसाठी हे सत्ता समर्थक सरकार आहे.

IPL_Entry_Point