मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Expressway Toll : समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? पाहा कसे आहेत दर

Samruddhi Expressway Toll : समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल? पाहा कसे आहेत दर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 15, 2022 10:11 PM IST

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर अंतर आणखी जवळ येणार आहे.हा महामार्ग (Samruddhi Expressway) पूर्ण झाल्यानंतर किती टोल भरावा लागणार, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल?
समृद्धी महामार्गावर किती भरावा लागणार टोल?

Samruddhi expressway Toll Rate : मंजुरीपासून ते जमीन अधिगृहन व नामकरणाच्या वादामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर अंतर आणखी जवळ येणार आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या एक्सप्रेस वे चे नामकरण करण्यात आले आहे. मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर किती टोल भरावा लागणार, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वी या महामार्गावर वाहनांना किती टोल द्यावा लागेल यांची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. त्याचा फोटा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे आधी टोलच्या दराबाबत जे अंदाज वर्तवले जात होते, त्याला पूर्णविराम लागला आहे. या फलकावर वेगवेगळ्या वाहनांसाठी कसे दर असतील याची माहिती देण्यात आली आहे. टोलचे हे दर पुढील तीन वर्षापर्यंत म्हणजे ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील त्यानंतर यामध्ये ठराविक टक्के वाढ केली जाईल.

 

<p>समृद्धी महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेला फलक</p>
समृद्धी महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेला फलक

या फलकावर नमूद केलेल्या दरांनुसार, साध्या चारचाकी वाहनांसाठी,अर्थात कार्ससाठीचा टोल या फलकावर नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार,या महामार्गावर प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोलची वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पासून थेट नागपूरपर्यंत ७०१ किलोमीटरचा पूर्ण प्रवास करणाऱ्या चारचाकी गाड्यांना जवळपास १२०० रुपये टोल भरावा लागणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग