मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitin Gadkari : नागपुर ते पुणे केवळ सात तासांत; समृद्धी महामार्गाला नवा मार्ग जोडणार; गडकरी यांची घोषणा

Nitin Gadkari : नागपुर ते पुणे केवळ सात तासांत; समृद्धी महामार्गाला नवा मार्ग जोडणार; गडकरी यांची घोषणा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 30, 2022 06:35 PM IST

Nitin Gadkari on Pune-Nagpur highway : नागपुर ते पुणे हा प्रवास आता जलद होणार आहे. केवळ ७ तासात नागपुरहून पुण्याला येता येणार आहे. या नव्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

नागपुर ते पुणे केवळ सात तासांत; समृद्धी महामार्गाला नाव मार्ग जोडणार
नागपुर ते पुणे केवळ सात तासांत; समृद्धी महामार्गाला नाव मार्ग जोडणार

नागपूर : नागपूर येथून पुण्याला येण्यासाठी तब्बल १४ ते १६ तास लागतात. प्रवासाचा हा वेळ कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. हा प्रवास जलद करून केवळ ७ तासांवर आणला जाणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडून नवा मार्ग तयार केला जाणार असून यामुळे हा प्रवास सुककर होणार आहे. या प्रकल्पाची माहिती गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे.

नागपूर ते पुणे हा वेळ खाऊ प्रवास आहे. पुण्याला येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता तसेच दळणवळणाच्या दृष्टीकोणातून हा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. या साठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला एक नाव मार्ग जोडून हा नाव मार्ग तयार केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट द्वारे दिली आहे. हा मार्ग जोडल्याने पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला केवळ ७ ते ८ तासात पोहचता येणे शक्य होणार आहे.

हा नाव मार्ग पुणे ते औरंगाबाद दरम्यान अससणार आहे. औरंगाबाद जवळ एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो समृद्धी मार्गाला जोडण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबादचा प्रवास साडेपाच तास तर औरंगाबाद ते पुणे प्रवास अडीच तास असा हा प्रवास केवळ ७ ते ८ तासांचा होणार आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग