मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले..

राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 28, 2022 11:55 PM IST

Devendra Fadnavis on Koshyari : शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यातच खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर नाजारी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुचक विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मुंबईच्या अस्मितेबाबत सतत वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपालपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची तसेच त्यांनी मनातील ही गोष्ट एका निकटवर्तीयाकडे गोष्ट बोलून दाखवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र राजभवनाने हे वृत्त निराधार असल्याचे म्हणत चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र राज्यपाल कोश्यारींना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती.त्याचबरोबर भावुक होत उदयनराजे यांचे डोळेही पाणावले होते. त्यांनी महापुरुषांची बदनामी करण्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती . यापार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले फडणवीस यांनी राज्यपालांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले. राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधीपक्ष एकवटले आहेत.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या