मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy Birthday Wishes: प्रियजनांना 'या' वाढदिवसाच्या मेसेजसह द्या शुभेच्छा!

Happy Birthday Wishes: प्रियजनांना 'या' वाढदिवसाच्या मेसेजसह द्या शुभेच्छा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 20, 2022 09:12 AM IST

Good Morning and Happy Birthday Wishes in Marathi: तुम्ही गोड संदेशासह तुमच्या मित्राला, प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.

सुप्रभात
सुप्रभात (Freepik)

एखाद्या व्यक्ती आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणी येईल कि नाही यापेक्षाही आपल्या जवळच्या व्यक्तीकडून शुभेच्छांची अपेक्षा करतो. वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फॅन्सी व्यवस्थेची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, मित्राला, कुटुंबातील सदस्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता. तुम्ही गोड संदेशासह वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील एक छोटासा भाग असल्याने त्यांना आनंद तर होईलच पण त्यांच्या चेहऱ्यावर हसूही येईल.

१) जगातील सर्व आनंद तुला मिळो,

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,

माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,

तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

२) आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

 

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

३) नातं आपल्या प्रेमाचं,

दिवसेंदिवस असच फुलावं,

वाढदिवशी तुझ्या,

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.

 

४) दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या,

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी,

माझी फक्त हीच इच्छा आहे,

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.

हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला!

 

५) व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग