मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Growth Tips: या प्रकारे करा केसांना मसाज, चांगली होईल हेअर ग्रोथ!

Hair Growth Tips: या प्रकारे करा केसांना मसाज, चांगली होईल हेअर ग्रोथ!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Nov 29, 2022 11:27 AM IST

Scalp Massage for Hair Growth: केसांच्या लांबीमध्येही हेड मसाज महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग जाणून घेऊयात कशा पद्धतीने मसाज केल्याने केस लांब आणि दाट होतील.

हेअर केअर
हेअर केअर (Freepik )

Hair Care: केसगळतीच्या समस्येमुळे जवळजवळ प्रत्येकजण सध्या त्रस्त आहे . सर्व वयोगटातील लोक या समस्येचा सामना करत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपचार घेत आहेत, तरीही विशेष परिणाम दिसून येत नाही. अशा परिस्थितीत, आपण आपल्या आहारात अशा काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर प्रमाणात आहे. याशिवाय हेड मसाज केसांच्या लांबीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या प्रकारे मसाज केल्याने केस लांब आणि दाट होतील.

केसांचा मसाज कसा करावा?

१) जर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ सुधारायची असेल, तर तुमच्या बोटांच्या साहाय्याने मध्यम दाब देऊन दररोज तुमच्या टाळूची मालिश करा. यामुळे तुमच्या स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारेल.

२) याशिवाय मसाज टूल्सच्या मदतीने तुम्ही हेड मसाज देखील करू शकता. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरणही सुधारते.

३) तुमच्या केसांची वाढ सुधारण्यासाठी, तुम्ही तुमचे केस धुता तेव्हा, शॅम्पू लावल्यानंतर तुमच्या टाळूची किमान ५ मिनिटे मालिश करा. त्यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. यानंतर हेअरवॉश करा.

४) जर तुम्हाला तुमच्या केसांची वाढ चांगली करायची असेल तर तुम्ही तेल न लावता दिवसातून दोनदा डोक्याला मसाज करू शकता. यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होईल.

५) त्याच वेळी, केसांची वाढ सुधारण्यासाठी केसांमध्ये कोणत्याही प्रकारची हीटिंग टूल्स वापरू नका. याचा वाईट परिणाम केसांवर होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग