मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock: अदानी समूहाच्या ‘या’ शेअरनं गाठला उच्चांक; सलग ८ दिवस तेजीत

Multibagger Stock: अदानी समूहाच्या ‘या’ शेअरनं गाठला उच्चांक; सलग ८ दिवस तेजीत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 07, 2022 06:29 PM IST

Multibagger Share : अदानी एन्टरप्रायझेसने टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या एका आठवड्यापासून शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका आठवड्यात तो 19 टक्क्यांनी वाढला.

AdaNI Share HT
AdaNI Share HT

Multibagger Share Adani : अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने सर्वाधिक भांडवली मुल्यांचा विक्रम करत टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या लीगमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या एका आठवड्यापासून शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एका आठवड्यात तो १९ टक्क्यांनी वाढला.

सोमवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर ३.५ टक्क्यांच्या वाढीसह शेअरने ३,९६७ रुपयांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. सलग आठव्या ट्रेडिंग दिवशी शेअरमध्ये चांगली वाढ झाली. गेल्या एका आठवड्यात स्टॉक १९ टक्क्यांनी वधारला आहे तर एस अँड पी बीएसई सेन्सेक्स ०.४५ टक्क्यांनी व निफ्टी ५० ०.८५ टक्क्यांनी वधारला आहे.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, सकाळी १०:०६ वाजता अदानी एंटरप्रायझेस ४.५२ ट्रिलियन रुपयांच्या भांडवली मूल्यासह संपूर्ण मार्केट-कॅप क्रमवारीत ९ व्या स्थानावर होता. आज कंपनीने मार्केट कॅप क्रमवारीत फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) कंपनी ITC आणि हाउसिंग फायनान्स फर्म हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) यांना मागे टाकले.

कंपनीला तिमाहीत नफा

जुलै-सप्टेंबर या तिमाहीत, अदानी एंटरप्रायझेसचा एकत्रित निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढून ४६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा एकत्रित महसूल देखील वर्षानुवर्षे जवळपास तीन पटीने वाढून ३८,१७५ कोटी रुपये झाला आहे. व्याज, कर आणि कर्जमाफीपूर्वी एकत्रित उत्पन्न (एबिटा) ६९ टक्क्यांनी वाढून २,१३६ कोटी रुपये झाले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या