युजवेंद्र चहलचा मोठा पराक्रम!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 09, 2024

Hindustan Times
Marathi

टी-२० क्रिकेटमध्ये ३५० विकेट घेणारा युजवेंद्र चहल पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ऋषभ पंतचा विकेट घेत हा टप्पा गाठला.

चहलने आपल्या ३०१व्या टी-२० सामन्यात हा विक्रम नोंदवला आहे.

या यादीत मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज पियुष चावला ३१० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

जागतिक स्तरावर टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल ११ व्या स्थानावर आहे.

फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल पाचव्या तर राशिद खान ५७२ विकेटसह पहिल्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ड्वेन ब्राव्होने ५७४ सामन्यांत ६२५ विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएलमध्येही जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत युजवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे.

PTI

जास्त मीठ खाण्याचे परिणाम