‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात योगिताचा गळा दाबला?

By Harshada Bhirvandekar
Aug 20, 2024

Hindustan Times
Marathi

‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातून आता दुहेरी एलिमिनेशनमुळे निखिल दामले आणि योगिता चव्हाण बाहेर पडले आहेत.

योगिता चव्हाणने ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर एका वाहिनीला मुलाखत दिली आहे.

या मुलाखतीत योगिताने घरात चालेल्या नियमांविरुद्ध चालेल्या खेळावर भाष्य केले.

नुकताच या घरात कॅप्टनसी टास्क झाला. यामध्ये निक्की तांबोळीने चांगलीच खेचाखेची केली.

याच खेळात योगिता चव्हाणने आपला दमदार खेळ दाखवला. मात्र, तिला दुखापत देखील झाली.

योगिताच्या गळ्यावर सध्या एका जखमेचं व्रण दिसत आहे. यामागची घटना तिने सांगितली.

त्या टास्कमध्ये मला निक्कीने माझं लक्ष विचलित करणं, हे उद्दिष्ट ठेवायला हवं होतं.

पण, मला शारीरिक दुखापत व्हावी याच हेतूने ती खेळत होती. यात माझा गळाही दाबला गेला, असे योगिता म्हणाली.

गळा दाबला गेल्यावर योगिताला दुखापत झाली होती, ज्याचा व्रण तिच्या मानेवर अजूनही दिसत आहे.

सर्वाधिक वेळा बोनस शेअर देणाऱ्या कंपन्या कोणत्या?