यशस्वी जैस्वालची नेटवर्थ किती?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 28, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याचा आज वाढदिवस आहे.
यशस्वीचा जन्म २८ डिसेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील भदोही येथे झाला होता.
त्याचे वडील भूपेंद्र जैस्वाल हे एका छोट्या हार्डवेअर स्टोअरचे मालक आहेत आणि आई कांचन गृहिणी आहे.
आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वीने भारतीय संघात स्थान निर्माण केले आहे. यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून चांगल्या फॉर्मात आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार यशस्वी जैस्वालची एकूण संपत्ती १६ कोटींच्या आसपास पोहोचली आहे.
२०१९ मध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे २ कोटी रुपये होती, जी २०२४ मध्ये १६ कोटी रुपये झाली.
यशस्वीचे उत्पन्नाचे साधन क्रिकेट आहे. तो दरमहा सुमारे ३५ लाख रुपये कमावतो, जे वर्षाला ४ कोटी ते ४.८ कोटी रुपये होते.
यशस्वी जयस्वाल आता वांद्रे (पूर्व) इमारतीच्या विंग ३ मध्ये ११०० चौरस फूट फ्लॅटमध्ये राहतो.
या अपार्टमेंटची किंमत ५.५ कोटी रुपये आहे. याआधी यशस्वीने ठाण्यात ५ बीएचके फ्लॅटही खरेदी केला होता, ज्याची किंमतही कोटींमध्ये आहे.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा