वर्ल्ड रेसलींग एन्टरटेनमेंट (WWE) चे माजी रेसलर 'द ग्रेट रेसलर खली' यांची ख्याती जगातील टॉप रेसलरच्या यादीमध्ये होते.
खलीचे खरं नाव दलिप सिंह राणा आहे. एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले होते की त्यांना सर्वाधिक कोणत्या रेसलरची भीती वाटायची ? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखे होते.
खली यांच्यामते असा कोणताच रेसलर नव्हता ज्याची त्यांना भीती वाटायची.
खली यांच्यानुसार त्यांचा WWEमध्ये ज्या कुणा रेसलरची सामना झाला तो जबरदस्तच होता.
जेव्हा खली यांना विचारण्यात आलं की असा कोणता रेसलर आहे की त्यांच्या सोबत फाईट करण्याचं त्यांच स्वप्न राहून गेलं. यावर खली यांनी द रॉक यांचं नाव घेतलं.
खली रेसलर होण्याआधी पंजाब पोलिस दलात कर्मचारी होते.
खली मूळचे हिमाचल प्रदेश येथील रहिवासी असून त्यांची पंजाबमध्ये रेसलींग अकादमी आहे. येथे ते तरुणांना प्रशिक्षित करतात.
५२ वर्षांचे खली यांचे लग्न झालं असून त्यांना दोन मुलं देखील आहेत. यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
खली सोशल मिडियावरअॅक्टिव असून नेहमी त्यांचे फोटो व व्हिडिओ ते त्यांच्या फॅन्स सोबत शेअर करत असतात.
खली यांनी ७ एप्रिल २००६ मध्ये WWE स्मॅकडाउनमध्ये डेब्यू केले होते. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि यशाच्या ऊंचीवर पोहोचले.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री