मानवाने तयार केलेली सर्वाधिक महाग वस्तु तुम्हाला माहिती आहे का? ही वस्तु जमिनीवर नसून अंतराळात फिरत आहे.
मानवाद्वारे तयार करण्यात आलेली जगातील सर्वाधिक महाग वस्तु म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. तब्बल १५ओ बिलियन डॉलर्स खर्चून हे स्पेस स्टेशन तयार करण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार नासाला या सेंटरच्या देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल ४०० कोटी डॉलर्स दरवर्षी खर्च करावे लागतात.
इंटरनॅशनल स्पेस सेंटर तयार करण्यात अनेक अडचणी आल्या. अनेक देशांनी हे सेंटर तयार करण्यासाठी योगदान दिले आहे.
अमेरिका, रूस, कॅनडा, आणि जपानने हे सेंटर तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा फंड
दिला आहे.
इंटरनॅशनल स्पेस सेंटर तयार करण्याचे काम २००० मध्ये सुरू करण्यात आले होते. या इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये विविध देशांचे वैज्ञानिक राहतात. या ठिकाणी ते विविध बाबींचा अभ्यास करतात.
इंटरनॅशनल स्पेस सेंटर पृथ्वीपासून जवळपास ४१० किमी दूर आहे. याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग २८ हजार किमी प्रतीतास एवढा आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान