वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये झळकणार?

By Harshada Bhirvandekar
Jul 21, 2024

Hindustan Times
Marathi

लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा सीजन ५ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कोणकोण सहभागी होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.  

दरम्यान, प्रेक्षकांनी मराठी मनोरंजन विश्वातील काही नावांबद्दल कयास बांधायला सुरुवात केली आहे.

मात्र, हे कलाकार खरंच या शोमध्ये दिसतील का यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही. 

‘बिग बॉस मराठी ५’ सुरू व्हायला आता एकच आठवडा उरलेला असताना अभिनेत्री वर्षा उसगावकर यादेखील शोमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत वर्षा उसगावकर यांनी माईची भूमिका साकारली होती. 

मात्र, नुकत्याच पार पडलेल्या भागात माईचा मृत्यू झाल्याचा दाखवले गेले आहे. 

त्यामुळे अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची या मालिकेतून एक्झिट झालेली आहे. 

वर्षा उसगावकर आता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

अद्याप यावर वर्षा उसगावकर यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?