सई ताम्हणकर राजकारणात उतरणार?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 18, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. 

सईने अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

सई ताम्हणकर तिच्या लूक्समुळे तसेच वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र, आता तिने राजकारणावर भाष्य केलं आहे.

सध्या देशभरात निवडणुकींचे वारे वाहत असताना आता सई ताम्हणकर हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ताकारणाविषयी बोलताना, राजकारण हा वेट आणि वॉचचा गेम असतो, असे सई ताम्हणकर हिने म्हटले आहे.

राजकारणात सध्या नव्या विचारसरणीची गरज आहे आणि ती राजकारणात येतही आहे, असे सई म्हणताच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

सई ताम्हणकर हिच्या या वक्तव्यामुळे आता सई ताम्हणकर राजकारणात उतरणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

सई सध्या कामात व्यस्त असून, ती ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

तर, प्रतीक गांधी आणि इमरान हाश्मीसोबत ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या नावाच्या दोन प्रोजेक्ट्समध्ये देखील ती दिसणार आहे.

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash