तेजश्री प्रधानचा घटस्फोट का झाला होता?

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Apr 02, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेच्या सहकलाकाराबरोबर लग्नगाठ बांधली होती.

Photo: Instagram

या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत झळकला होता.  

Photo: Instagram

या मालिकेचे शूटिंग सुरू असतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न गाठ बांधली होती. 

Photo: Instagram

मात्र, लग्नाच्या काही महिन्यातच दोघांच्या नात्यात अनेक वितुष्ट आले आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 

Photo: Instagram

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी वेगळी होतेय, हे कळल्यावर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.

Photo: Instagram

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्यामध्ये नेमकं काय झालं, ज्यामुळे ते वेगळे झाले? हे सगळ्यांनाच जाणून घ्यायचे होते.

Photo: Instagram

पत्नीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि कुटुंबातील व्यक्तींचा होणारा अपमान ही घटस्फोटाची कारणं असल्याचं शशांक केतकरनं त्याच्या अर्जात म्हटलं होतं. 

Photo: Instagram

कोर्टाने या दोघांची केस समुपदेशकाकडे पाठवली होती. दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला गेला. 

Photo: Instagram

मात्र, याचा दोघांवरही काही फरक पडला नाही. अखेर त्यांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

Photo: Instagram

आज या ५ राशींसाठी पैशांचा दिवस