सिद्धार्थ जाधवने का सोडली ‘सेक्रेड गेम्स’ सीरिज?

By Harshada Bhirvandekar
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या चर्चेत आला आहे.  

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिज सोडण्यावर भाष्य केलं आहे.

सुरुवातीला या भूमिकेसाठी सिद्धार्थ जाधव याला विचारणा झाली होती. मात्र, असं काय झालं की, सिद्धार्थ जाधवने तडकाफडकी ही सीरिज सोडली?

याविषयी बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, ‘भूमिका चांगली होती म्हणून, मी हो म्हटलं होतं.’ 

मात्र, नंतर जेव्हा मानधन रक्कम ठरवण्याची वेळ आली, तेव्हा सगळ्याच गोष्टी बदलून गेल्या. 

मानधनाची बोलणी सुरू असताना अपेक्षेपेक्षा कमी मानधन मिळत होतं, म्हणून सिद्धार्थने त्यांच्याकडे याबद्दल विचारणा केली. 

तर, आम्ही सगळ्या मराठी कलाकारांना इतकेच पैसे देतो, तुला काय अडचण आहे?, असं मेकर्सनी म्हटलं. 

पैसा म्हणजे सगळं काही नाही, तुम्हाला मानसन्मान आणि आदरही मिळायला हवा आणि याचमुळे मी ती सीरिज सोडली, असे सिद्धार्थ म्हणाला. 

विशेष म्हणजे सिद्धार्थने ही भूमिका सोडल्यानंतर पुढे ती व्यक्तिरेखाच सीरिजमधून काढून टाकण्यात आली होती.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान