हॉटेल, लग्नघरे किंवा इतर समारंभात जेवणानंतर बडीशेप आणि साखर दिली जाते.
याचे अनेक फायदे आहेत. काही लोक बडीशेप, खडी साखर माऊथ फ्रेशनर म्हणून वापरतात.
जेवणानंतर बडीशेप-साखर खाल्ल्याने पचन सुलभ होते आणि पोटशूळाच्या कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत.
जेवणानंतर साखर आणि बडीशेप सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि हिमोग्लोबिनची समस्या देखील कमी होते.
या दोन्ही घटकांमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी खूप चांगले असते.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानंतर ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो.
जेवणानंतर तोंडातून येणारी दुर्गंधी रोखण्यासाठी बडीशेप खूप फायदेशीर आहे.
जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने सर्दी, खोकला किंवा इतर आरोग्यविषयक समस्यांपासून बचाव होतो.
बडीशेप रिकाम्या पोटीही खाऊ शकता, पण जेवणानंतर खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
टीप: ही माहिती सामान्य ज्ञान आणि माहितीवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी ही माहिती पूर्णपणे अचूक असल्याचा दावा करत नाही. या विषयावरील अचूक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.