सडपातळ तरुणींनाच हवाईसुंदरी का बनवतात एअरलाईन्स कंपन्या?
By
Shrikant Ashok Londhe
Nov 13, 2024
Hindustan Times
Marathi
एअर होस्टेस स्लिम असली पाहिजे, एअरलाइन्सच्या या अटीबाबत तुम्ही ऐकले असेलच, अनेक एअरलाइन्स वजन नियंत्रणात ठेवण्यासही सांगतात.
अनेक वेळा पाहायला मिळते की, फ्लाइट अटेंडेंट्सचे वजन वाढल्यास एअरलाईन्स कंपनीलने त्यांना ग्राउंड स्टाफमध्ये शिफ्ट केले आहे.
चीनमधील Hainan Airlines पासून भारतातील एअर इंडियापर्यंत अनेक एयरलाइन्सने अधिक वजनामुळे हवाई सुंदरींना ग्राउंड स्टाफमध्ये शिफ्ट केले आहे.
काही एअरलाइन्सचे यामागील कारण खूपच आश्चर्यचकीत करणारे आहे, या कंपन्या विमानाचे वजन कमी करण्यासाठी असे करतात.
रिपोर्ट्सनुसार, जेव्हा फ्लाइटमध्ये एक किलो अधिक वजन होते तेव्हा एका तासाच्या हिशोबाने ३ रुपये अधिक खर्च होतो.
त्यामुळे हवाई सुंदरींचे वजन कमी करून एअरलाइन्स कंपन्या वर्षाला जवळपास २ कोटी रुपयांपर्यंतची बचत करतात.
दरम्यान, काही एअरलाइन्स असे करण्याचे कारण, अधिक वजन असल्यामुळे एअर होस्टेस इमरजन्सीमध्ये सक्रीय राहू शकत नाही.
एअर होस्टेसचे नाव आपत्कालीन परिस्थितीशीच जोडले गेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत ओव्हरवेटमुळे खूपच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
एअरलाइन्सने आपले बीएमआय प्रमाण सेट केले आहे, जसे की, पुरुषांसाठी १८-२५ आणि महिलांसाठी २२-२७ बीएमआय निश्चित आहे.
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा