मंदिरातून बाहेर येताना घंटा का वाजवू नये?

By Harshada Bhirvandekar
Mar 26, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू रितीरिवाजांमध्ये अनेक श्रद्धा आहेत, ज्या आपण सर्वजण पाळतो. यापैकीच एक म्हणजे मंदिरातील घंटा वाजवणे. 

धार्मिक मान्यतेनुसार सृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा जो आवाज झाला तो पहिला आवाज घंटेचा होता. 

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, लोक मंदिरात जाताना घंटा वाजवतात. पण, मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये. 

मंदिरात प्रवेश करताना आपण घंटा वाजवतो. असे मानले जाते की, घंटा वाजवल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 

मंदिरातील घंटेचा हा नाद देवाला खूप प्रिय असतो, असेही म्हटले जाते. 

घंटा वाजवून मंदिरात प्रवेश करणे म्हणजे आपण आत येण्यासाठी देवाची परवानगी घेतो. 

पण, मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये, असे पुराणात सांगितले आहे. 

असे मानले जाते की, जर तुम्ही परतताना बेल वाजवली तर घंटेच्या आवाजाने सर्व सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी मंदिरातून परतताना घंटा वाजवणे टाळावे.

काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...