संध्याकाळनंतर फुले व पाने का तोडू नयेत?

By Priyanka Chetan Mali
Jan 21, 2025

Hindustan Times
Marathi

आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा अनेक परंपरा आणि श्रद्धा हिंदू धर्मात पाळल्या जातात. यापैकी एक म्हणजे संध्याकाळनंतर फुले आणि पाने तोडू नयेत.

झाडे आणि वनस्पतींनाही जीवन असते आणि ते सूर्यास्तानंतर विश्रांती घेतात, अशी धार्मिक धारणा आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळी त्यांना स्पर्श करणे अशुभ मानले जाते.

हिंदू धर्मात कोणाच्याही झोपेत अडथळा आणणे किंवा ते विश्रांती घेत असताना त्यांना त्रास देणे अयोग्य मानले जाते. अशा परिस्थितीत संध्याकाळी फुले व पाने तोडण्यास मनाई आहे.

झाडे आणि वनस्पतींमध्ये कीटक आणि पक्षी राहतात, जे संध्याकाळी विश्रांती घेतात. अशात जर आपण झाडांना स्पर्श केला तर कीटक आणि पक्ष्यांनाही त्रास होतो.

हिंदू धर्मात पूजेसाठी लागणारी फुले सकाळी तोडण्याची परंपरा आहे. यामुळे पूजेला लागणारे फुल-पानं ही सकाळीच तोडायला हवी.

सायंकाळी फुले व पाने तोडू नये यामागे वैज्ञानिक कारणही सांगितले जाते.

वैज्ञानिक दृष्ट्या झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे रात्री झाडांना हात लावणं आणि त्यांच्या जवळ जाणं चांगलं नाही असे सांगितले जाते. 

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

पनीरपासून बनतात 'हे' चटपटीत स्नॅक्स!