नागपंचमीच्या दिवशी चपात्या का बनवत नाहीत? वाचा कारण...

By Harshada Bhirvandekar
Aug 08, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात, यामागे काही श्रद्धा आहेत.

अशीच एक धारणा नागपंचमीच्या सणाबाबत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. 

यंदा नागपंचमीचा सण ९ ऑगस्टला साजरा होणार आहे. यादिवशी नाग देवता आणि शिवाची पूजा केली जाते.

पण, तुम्हाला माहित आहे का की या दिवशी चपात्या बनवणं निषिद्ध आहे. का? जाणून घेऊया...

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी स्वयंपाक घरात तवा न वापरण्याची प्रथा आहे.

असे मानले जाते की, या दिवशी तवा वापरल्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा नाराज होतात.

यामुळे घरात अन्नाची आणि पैशाची कमतरता निर्माण होते. तसेच लोखंडी गोष्ट देखील वापरू नये.

धार्मिक मान्यतेनुसार, चपाती बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तव्याचा संबंध सापाच्या फण्याशी असतो.

असेही म्हटले जाते की, तवा हे राहूचे प्रतीक आहे. यामुळे कुंडलीत राहूचा प्रभाव वाढू शकतो.

नागपंचमीच्या दिवशी तव्यावर चपाती बनवल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay