दुपारच्या वेळी मंदिरात का जाऊ नये? वाचा...
By
Harshada Bhirvandekar
Mar 27, 2024
Hindustan Times
Marathi
दररोज मंदिरात जावे, असे शास्त्रात सांगितले आहे. असे मानले जाते की, मंदिरात दर्शन केल्याने अनेक फायदे होतात.
मंदिरात गेल्याने सकारात्मकता वाढते. जीवनात आनंद येतो. देवाचे आशीर्वादही आपल्या पाठीशी राहतात.
मात्र, मंदिरात नेहमी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी जावे, असेही शास्त्रात सांगितले आहे.
पण, आपण दुपारच्या वेळी मंदिरात का जाऊ शकत नाही? जाणून घ्या याचे कारण...
शास्त्रानुसार, दुपारी मंदिरात जाणे निषिद्ध आहे. दुपारच्या वेळी आपली शरीर आळसाने भरलेले असते. मनही निद्रिस्त असते.
अशा स्थितीत दुपारी आळशी मनानं देवाजवळ जाऊ नये. बहुतेक मंदिरांचे दरवाजेही दुपारच्या वेळी बंद असतात.
कारण, दुपारची वेळ ही देवांची झोपण्याची आराम करण्याची वेळ असते. दुपारच्या वेळी देवांना देखील झोप लागते.
अशावेळी, दुपारी मंदिरात जाणे म्हणजे परमेश्वराच्या झोपेत विघ्न आणण्यासारखे आहे.
शास्त्रानुसार, दुपारचा काळ हा भूत, पित्र आणि अतृप्त आत्म्यांचा काळ आहे. या कारणांमुळे दुपारी मंदिरात जाण्यास मनाई असते.
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा