हिंदू धर्मात धार्मिक पूजा-विधीनंतर हातात रक्षासूत्र बांधण्याचे खास महत्व मानले जाते.
रक्षासूत्राला कलावा आणि माऊली असेही म्हणतात. हा एक लाल-पिवळा धागा असतो. जाणून घेऊया रक्षासूत्र हातात बांधण्याचे काय नियम आहेत.
नियमानुसार रक्षासूत्र मनगटावर तीन वेळा गुंडाळा, तीन वेळा गुंडाळल्याने ब्रम्हा, विष्णू आणि महादेवाची कृपा प्राप्त होते.
धर्मशास्त्रानुसार रक्षासूत्र पुरूष आणि कुवाऱ्या मुलींनी उजव्या हातावर तर महिलांनी डाव्या हातात बांधण्याचा नियम आहे.
रक्षासूत्र बांधताना मुठ्ठी बंद ठेवली पाहीजे आणि दूसरा हात डोक्यावर ठेवावा. महिला रक्षासूत्र बांधताना डोक्यावर ओढनी किंवा पदल घेऊ शकतात.
पंडीत रक्षासूत्र बांधताना मंत्र म्हणतात. मंत्रोच्चारसह रक्षासूत्र बांधणे फार शुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, रक्षासूत्र बांधण्याने ब्रम्हा, विष्णू आणि महेश, देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.
रक्षासूत्र बांधल्याने ब्लड प्रेशर, वात-पित्त, कफ आणि शुगर इ. समस्या नियंत्रणात राहतात, असे सांगितले जाते.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी