अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात?

By Harshada Bhirvandekar
Nov 25, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदू धर्मात अशा अनेक परंपरा आहेत, ज्या शतकांनुशतके चालत आलेल्या आहेत. या परंपरांचे स्वतःचे खास कारण आणि महत्त्व आहे. 

मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, असे म्हणतात. कोणत्याही मानवाच्या मृत्यूनंतर प्रत्येक धर्मात अंतिम संस्कार करण्याची तरतूद आहे. 

हिंदू धर्मात मृत्यूनंतर मृत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली जाते आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीस नेला जातो. 

अंतयात्रेत उपस्थित असलेले कुटुंबातील सदस्य आणि इतर लोक वारंवार ‘राम नाम सत्य है’ असे म्हणतात. पण ते असं का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का?

महाभारताचे मुख्य आणि पांडवांमधील ज्येष्ठ म्हणजेच युधिष्ठिर यांनी अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात हे सांगितले आहे. 

अंत्ययात्रा घेऊन जाताना मृत व्यक्ती आयुष्य पूर्ण करून सर्वांना निरोप देत असते. दुसरीकडे, असेही लोक असतात जे आपलं जीवन जगत असतात. 

अंत्ययात्रेवेळी म्हटली जाणारी ‘राम नाम सत्य है’ ही ओळ तुम्हाला सांगते की, आयुष्यात मिळवलेली प्रत्येक गोष्ट तिथे मागेच राहते आणि शेवटी फक्त राम नाम सोबत असते. 

अशावेळी मृत व्यक्तीसाठी ‘राम नाम सत्य है’ असे म्हटले जात नाही, तर मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना कळावे म्हणून ‘राम नाम सत्य है’ म्हटले जाते. 

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणती माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय!