हनुमानाला बजरंगबली का म्हणतात? तुम्हाला माहितीय?
By
Harshada Bhirvandekar
May 18, 2024
Hindustan Times
Marathi
भगवान श्रीरामाचे महान भक्त हनुमान यांना शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाची देवता मानले जाते.
महाबली हनुमानजींना अनेक नावांनी संबोधले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. त्यांचे एक नाव बजरंगबली देखील आहे.
पण, त्यांना बजरंग बली हे नाव कसे पडले तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया…
रामायणानुसार, हनुमानजींना बजरंगबली हे नाव त्यांच्या वडिलांनी केसरी यांनी दिले होते.
असे म्हटले जाते की, हनुमानजी खूप बलवान आहेत. त्यांचे शरीर वज्रासारखे आहे, म्हणून त्यांना बजरंगबली म्हणतात.
असे म्हणतात की, शक्ती आणि बुद्धीची देवता असणारे हनुमानजी यांनी एकदा संपूर्ण पर्वत आपल्या हाताने उचलला होता.
पुराणात सांगितल्यानुसार, त्यांचे शरीर वज्राच्या जोतासारखे टणक आहे, म्हणून त्यांना ‘बजरंगबली’ म्हटले जाते.
एका पौराणिक कथेनुसार, हनुमान लहान होते, तेव्हा खूप खोडकर होते. एकदा खेळता खेळता त्यांनी सूर्यदेवाला गिळंकृत केले.
हे वृत्त समजताच क्रोधीत झालेल्या इंद्राने हनुमानजींच्या हनुवटीवर वज्राचा प्रहार केला. त्यामुळे ती तुटली आणि यानंतर त्यांना हनुमान हे नाव मिळाले.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा